गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (09:24 IST)

या तरुणाने भंगारातील साहित्य गोळा करून बनविली प्रदूषण विरहीत गाडी

Pollution free vehicle from scrap in Sangli
सांगलीमधील विश्रामबाग माध्यमिक विद्यालयात शिक्षणाऱ्या अर्जुन खरातने भंगारातून प्रदूषण विरहीत गाडी साकारली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात याने भंगारातून साकारलेली प्रदूषण विरहीत गाडी बनवल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
 
अर्जुनने भंगारातील साहित्यातून चक्क चारचाकी प्रदूषणविरहित ट्रामगाडी बनवली आहे. कोरोना काळात अर्जुनच्या घराचे बांधकाम सुरू होतं. तेव्हा त्याने ग्रीलचे भंगार (वेस्टेज) साहित्य जमवले आणि त्याचे वेल्डिंग करून 'सनी मोपेडचे इंजिन', मारुती वाहनाचे स्टेरिंग आणि सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली. पहिल्या प्रयत्नात त्यास फारसे यश आले नाही मात्र नंतर त्याने इनोव्हेशन करायचं ठरवलं. 
 
मारुतीचे स्टेरिंग आणून स्टेरिंग रॅक जोडला, मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकप्सर बसवले आणि त्याला मोपेडची चाके बसवली. मागच्या बाजूला एक्सेल बार आणि मध्यभागी चीन वेल बसवले. मोपेडचे ड्रम वेल लावले आणि मग गाडी चालवून बघितली तेव्हा तोही प्रयत्न फसला नंतर गाडीचं वजन कमी केलं तेव्हा गाडी चालायला लागली. बॉडी कव्हरसाठी पत्रे लावले. 
 
अर्जुनने शाळेतील विज्ञान प्रदर्शनमध्ये 'प्रदूषण विरहित' इलेक्ट्रिक वर चालणारी गाडी दाखवण्याचं ठरवलं. त्याने त्याच्या वाहनास 48 वॅाल्टची डीपी मोटार आणि 12 वॅटच्या चार बॅटरी बसवल्या. त्याच्या प्रयत्नाने अखेर ट्रामगाडी तयार झाली.
 
ही गाडी 48 वॅट बॅटरीवर 15 किलोमीटर चालते.