गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (10:57 IST)

गॅस सिलेंडर स्फोटात मायलेकीचा होरपळून मृत्यू

mother and daughter died in gas cylinder blast in Yavatmal
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका कटुंबातील आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुखद बातमी आहे.
 
आर्णी तालुक्यातील आयता गावात आज सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एक महिला व एक मुलगी आगीत भाजून मृत्यूमुखी पडले. काजल विनोद जैस्वाल (वय 30) व वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.
 
एकाच कुटुंबातील 2 जण ठार झाल्याची बातमी ऐकून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीत संपूर्ण घरही जळून खाक झाले. काजल गॅस पेटविताना ही घटना घडली आणि त्यात त्या आणि जवळ असलेली त्यांची मुलगी आगीत होरपळल्या. या घटेनत दोघांची मृत्यू झाला.