शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (19:30 IST)

नागपूरमध्ये लखडगंज परिसरात कचऱ्यात आढळले 5 बाळं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लखडगंज भागात कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भकं आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केटी वाईन शॉप्सजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये बुधवारी सायंकाळी पाच अर्भकं आढळली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिकांनी ही अर्भक दिसले आणि त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. सूचनांवर त्वरीत कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकूण पाच अर्भक असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचही अर्भक ताब्यात घेतले आहे.
 
हे पाच अर्भक कुणी आणि का टाकले? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.