मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पत्नीचे डोके हातोड्याने ठेचून मुलाला व्हिडीओ कॉल केला

crime news
नैराश्यातून एका धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याची समोर आली आहे. कंपनी बंद पडली म्हणून नैराश्यात पतीने झोपेतच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
 
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला नंतर हातोडीने डोक्यात 12 घाव केले नंतर मुलाला व्हिडिओ कॉल करत स्वत:च या कृत्याची माहिती दिली आहे.
 
लीला निवृत्ती नाफडे असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी पतीची ज्या कंपनीत काम करत होता ती बंद पडुन नोकरी गेल्यामुळे आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावात असलेल्या पतीने पत्नी झोपेत असताना खून केला. त्यानंतर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून आईचा मृतदेह दाखवला. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
 
गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात आरोपीने हातोडीने १२ वेळेस वार केले. हातोडीने डोके ठेचून नंतर मुलाला व्हिडिओ कॉल करून या कृत्याची माहिती दिली. मुलाने तातडीने पोलिसांना फोन करुन कळवले. घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी घरातच बसलेला होता. मृतदेह रुग्णालयात पाठवून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि मुलाच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी वडिलांना अटक केली.