1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:35 IST)

IPS अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल : तुकाराम मुंढेंनंतर विश्वास नांगरे पाटील यांचीही बदली

सध्या राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल केले आहे. सरकारने 40 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलीस दलातील बदल्यांबाबत चर्चा सुरू होती. मात्र गणेशोत्सवादरम्यान ही न करता पुढे ढकलण्यात आली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती झाली आहे. नाशिकमध्ये त्यांच्या जागी दीपक पांडे हे पदभार स्वीकारणार आहे. याशिवाय नाशिक परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षक पदी बदली झाली आहे. प्रताप दिघावकर हे आता विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
मिलिंद भारंबे – गुन्हे सहआयुक्त
बिपीन कुमार सिंह – नवी मुंबई पोलीस आयुक्त
कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक – मनोजकुमार लोहिया
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त – कृष्णप्रकाश
अमरावती आयुक्तपद – आरती सिंह