तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यातील अंतर वाढले होते, परंतु अलिकडच्या काळात काका-पुतण्यांमध्ये नवीन करार झाल्याच्या बातम्या येत आहे. गुरुवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक बैठकीत दोन्ही नेते एकत्र दिसले. आठवड्यातून दुसऱ्यांदा काका आणि पुतण्या एकाच मंचावर दिसले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमापूर्वी महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खोलीत घाईघाईने प्रवेश केला. यानंतर, दोन्ही नेत्यांमध्ये 1 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.#WATCH | Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar and Dy CM Ajit Pawar shared stage during the annual general meeting of Vasantdada Sugar Institute in Pune. pic.twitter.com/38LdkF8u71
— ANI (@ANI) January 23, 2025