1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2017 (15:35 IST)

सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे? - अजित पवार

ajit panwar
घाटकोपर येथील सिद्धिसाई या इमारतीला झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली. सिद्धीसाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आहे. ज्या ज्या वेळी पावसाळा येतो तेव्हा अशा घटना घडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. घाटकोपर येथील इमारत तळमजल्यावरील नुतनीकरणाच्या कामामुळे झाला आहे.
 
या कामाला पालिकेची परवानगी न घेता इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल केला गेला. तक्रार देऊनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप यांनी रहिवास्यांच्या तक्रारीला न जुमानता हे नुतनीकरणाचे काम केले होते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून या गंभीर विषयावर सभागृहात याची चर्चा करावी यासाठी मुंडे यांनी सभागृहात २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.
 
सरकारच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे दरवर्षी कित्येक हकनाक बळी जातात. सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे, असा जळजळीत प्रश्न विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी सभागृहात विचारला. यावर काहीतरी उपाय होणार आहेत की नाही असा त्यांनी सरकारला जाब विचारला.