Marathi Biodata Maker

वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:52 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रस्तावित दौऱ्यावरदेखील अजित पवार यांनी तोंडसुख घेतलं. 
 
शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

परभणीमध्ये नीट पेपरफुटीच्या तणावामुळे १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणामुळे परभणी येथील विद्यार्थ्याने आत्महत्या केली

मध्य प्रदेशात एका व्यक्तीने कुऱ्हाडीने स्वतःचे गुप्तांग कापले; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

पुणे दारू घोटाळ्यात मोठा खुलासा: आरोपीने ऑनलाइन मिथेनॉल मागवून 'मृत्यूचे कॉकटेल' तयार केले होते

"प्रत्येक आदिवासी महिलेला एक गाय आणि एक म्हैस दिली जाईल," केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments