1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मार्च 2025 (19:05 IST)

दरवर्षी 3 ऑक्टोबरला मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याची अजित पवारांची घोषणा

ajit pawar
सध्या देशात हिंदी भाषेवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र सरकारने दरवर्षी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. या साठी 3 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. 
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आता 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस' म्हणून साजरा केला जाईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले. 
 
ते म्हणाले की, 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या मूळ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनापासून आभार मानतो.
आतापासून दरवर्षी 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल, तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' साजरा केला जाईल. अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अभ्यासासाठी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठात उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि भाषांतर अकादमी स्थापन केली जाईल, असेही अजित पवार म्हणाले
याशिवाय मराठी भाषेच्या जतनासाठी काम करणाऱ्या संस्थांमार्फत अभिजात मराठी भाषेचे उपक्रम राबविले जातील. मराठी भाषेच्या संशोधनात उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू केले जातील अशी घोषणाही अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.उत्तर प्रदेशातील आग्रा येथे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले जाईल.असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit