शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (20:58 IST)

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे

फोटो साभार फेसबुक 
गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मारला आहे.
 
महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना 'पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,' असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावलाय.