शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (14:25 IST)

Ajit pawar : अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटर पोहोचले

sharad pawar ajit pawar
सध्या राज्यात अजित पवारांच्या बंड नंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्र दौरे सुरु झाले. अजित पवार शासन आपल्या दारी या मोहिमेतून लोकांची भेट घेत होते. अजित पवार यांनी सिल्व्हर ओक जाऊन काकी प्रतिभाताईंची भेट घेतली. 

आज अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आमदार आणि मंत्र्यांसह वाय बी सेंटर येथे पोहोचले आहे. अजित पवार यांच्या समवेत छगन भुजबळ, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफ्फुल पटेल हे देखील आहे. 

शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, हे देखील वाय बी सेंटरला पोहोचले आहे. 
पावसाळी अधिवेशन आता सुरु होणार आहे त्यापूर्वी अजित पवार यांनी मंत्र्यांसह बैठक घेतली. त्यांच्या देवगिरी निवास स्थानी ही बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीसाठी वाय बी  चव्हाण सेंटर ला पोहोचले आहे. भेटीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
    
Edited by - Priya Dixit