गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (09:06 IST)

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले..

ajit pawar
उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यार रंगलेल्या या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या प्रतिक्रियेचीही आता चर्चा होत आहे.
 
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादाबाबत चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, तुम्ही बघा हे सर्व महिला महिलांचंच चाललेलं आहे. आम्ही कुणी त्याच्यात भाग घेतला आहे का? आम्ही तर महिलांना संधी देतोय. परंतु संधी देत असताना त्या संधीचं सोनं करायचं की राख करायची, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor