रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (07:42 IST)

कितीही ज्योतिषी येऊ द्या, सरकार भक्कम आहे : अजित पवार

सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावर्षात अनेक संकटे आलीत. कमी पैशात चांगले काम केले आहे. महाविकास आघाडी सरकार  पाडण्याच्या अफवा उठविण्यात आल्यात.  कितीही ज्योतिषी येऊ द्या, सरकार भक्कम आहे. अनेकांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न झाला. समान कार्यक्रम हा समान धागा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणाले.
 
महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली. यानिमित्ताने 'महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही' या कामकाज पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. 
 
वेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांनी आटापिटा केला. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार चालवण्याचे जोपर्यंत ठरवले आहे तोपर्यंत या सरकारला काहीही होणार नाही, असे ठणकावून सांगितले.