1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:17 IST)

अजित पवारांनी सांगितला किस्सा आणि उपस्थितांना हसू झाले अनावर

ajit pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार  हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जातात. अशाच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांना हसू अनावर झालं. बारामतीत सुरु असलेल्या मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार यांच्यावर डॉ. तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रिया केली होती.
 
"एकदा परदेशात गेल्यावर मला जाणवलं की माझ्या डोळ्याला काही झालं आहे. त्यानंतर पुन्हा मंत्रालयात असताना मला डोळ्याला त्रास होत असल्याचे जाणवलं. मी तिथून उठलो आणि गाडीत बसलो आणि डॉक्टर लहाने यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी बॅटरी डोळ्यात टाकली आणि त्यांनी काहीतरी तपासलं. ते म्हणाले तुमचा रॅटिनाचा प्रॉब्लेम आहे. त्याला लेझरने बांध घालावा लागेल. उसाला बांध घालतो तसा डोळ्यात बांध घालावा लागेल असे ते म्हणाले. डॉक्टर सांगतात ते ऐकावे लागतं. ते म्हणाले कधी ऑपरेशन करायचे मी आत्ताच्या आता करा सांगितले. घरी ऑपरेशन झाल्यावर सांगेन. तिथेच डॉक्टरांनी मला आडवा केला आणि डोळ्यात बांध घातला," असे अजित पवार म्हणाले.
 
"मी त्यांना हे मलाच का झाले असं विचारलं तर अजित पवार हे दहा लाखांमध्ये एका होतं असं त्यांनी सांगितले. बरा दहा लाखांत मीच सापडलो. त्यानंतर चष्मा वापरायला लागतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे," असेही अजित पवार म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor