गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:08 IST)

आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत : सुळे

supriya sule
“जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत.
 
कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील विधानसभा सभेच्या पोट निवडणुकीची तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही निवडणुका पक्षातील वरीष्ठ नेते बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor