सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (14:08 IST)

खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीला पुण्यात कार्यक्रमा दरम्यान आग लागली

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा साडीने पुण्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान पेट घेतला. सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना साडीने पेट घेतला. तातडीने आग वीझवण्यात आल्यामुळे सुप्रिया ताई मोठ्या संकटातून बचावल्या.  सुप्रिया सुळे या पुण्यात हिंजवडी येथे कराटे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. दीपप्रज्वलन कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने पेट घेतला. कार्यकर्त्यानी प्रसंगावधान राखून तातडीने आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.  

Edited By - Priya Dixit