गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (13:46 IST)

देव तारी त्याला कोण मारी! ट्रेन पकडताना महिलेचा तोल गेला VIDEO

video viral
पुणे- पुणे रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला आहे. येथे प्रगती एक्स्प्रेसमध्ये चढताना महिलेचा तोल गेला आणि त्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्या. या महिलेची स्टेशन कर्मचाऱ्यांनी सुटका केली. चढण्याच्या घाईत तोल गेल्याने त्या खाली पडल्या मात्र काही क्षणातच त्यांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मध्य रेल्वेने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
 
ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल विनोद कुमार मीना यांनी तत्काळ त्या महिलेला बाजूला ओढले. नागरिक आणि आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत त्या महिलेला वाचवलं. प्रगती एक्सप्रेस या रेल्वेने त्या मुलीसह मुंबईला निघाल्या होत्या.
 
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने मुलीसोबत रेल्वे सुटायला नको म्हणून घाईगडबडीत पळत आपल्या मुलीला रेल्वेत बसवलं मात्र धावत्या रेल्वेत चढताना या महिलेचा तोल गेला आणि त्या खाली घसरल्या. हे थरारक घडत असताना सुदैवाने आरपीएफ जवान देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी प्रसंगावधान राखत महिलेला बाहेर खेचून त्यांचा जीव वाचवला.