मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (15:37 IST)

राज ठाकरे आज काय बोलणार ?, पुण्यात करणार भाषण

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.  या अगोदर दहा वर्षांपूर्वी त्यांचं फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्यान झालं होतं. त्यामुळे आता राज ठाकरे ‘नवं काहीतरी’ विषयावर  बोलणार आहे. सहजीवन व्याख्यानमालेत ते संवाद साधणार आहेत. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
 
राज ठाकरे यांनी २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात एकच सभा घेतली होती. त्यानंतर त्यांचे पुणेकरांसाठी जाहीर भाषण झालेले नाही. मनसेच्या वर्धापनदिनाच्या ९ मार्च २०२२ मधील मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले होते. राज ठाकरे यांचे मेळाव्यातून किंवा पक्षाच्या जाहीर सभांतून भाषणे झाली असली तरी ती राजकीय स्वरूपाची होती. दहा वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी संवाद साधला होता. त्यामुळे या व्याख्यानामध्ये राज ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
Edited by - Ratnadeep Ranshoor