सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (23:43 IST)

पुणे -मुंबई महामार्गावर ट्रक अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

accident
पुणे -मुंबई महामार्गावर दोन ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ट्रक पलटी होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाला. सूर्यकांत कांबळे रा.उमरगा जी.उस्मानाबाद मूळ कर्नाटक असे या मयत ट्रक चालकाचं नाव आहे. तर दुसऱ्या ट्रक मधील चालकांसहित दोघे जखमी झाले.

मयत सूर्यकांत कांबळे हे ट्रक मध्ये सिमेंट घेऊन पुणेवरून मुंबईकडे जात असताना अपघाताच्या स्थळी पोहोचल्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे ट्रक रोडवर पालटला आणि अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सिमेंटच्या गोण्या रस्त्याभर पसरल्या होत्या. या मुळे वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून बजेल करून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु करण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit