गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:36 IST)

फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला

rashmi shukla
पुणे -राज्यातील मोठय़ा नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.
 
रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना राज्यातील मोठय़ा नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलीस तपास करत होते. परंतु, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला आहे.
 
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये सेवेत आहेत. सत्ता बदल झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची, तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे त्यांच्यावरील चौकशी थांबण्यासाठी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor