सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (14:14 IST)

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बंदोबस्तात वाढ

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांचे आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर कडाक लक्ष ठेऊन आहेत. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. १३) रात्री पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांना फोनद्वारे देण्यात आली होती. या धमकीनंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरामधील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
 
तसेच श्वान पथकाच्या मदतीने रेल्वे स्टेशन आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, तिथे पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. हा फोन मनमाडहून अज्ञात व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाशिकला रवाना झाले आहे. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor