अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी पदभार न स्वीकारताच दिला राजीनामा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उद्या (27) सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करावयाचे आहे. त्याआधिच राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने भाजपचा पाय खोलात गेला आहे.
आज सकाळी अजित पवार यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार बंधू श्री निवास पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये ते रजीनामा देण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी यशस्वी खेळी म्हणता येईल.