शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (20:44 IST)

अजित पवार मुख्यमंत्री होणार, ११ मे नंतर राज्यात नवे सरकार? कायदेतज्ञांच्या दाव्याने मोठी खळबळ

ajit pawar
सध्या एकाचवेळी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. अशातच सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. आता राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार? याबाबत अनेक तज्ञ अंदाज वर्तवत आहेत.
दरम्यान  कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या यांनी आता एक मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वकील असिम सरोदे यांनी  11 मे अजित पवार येत्या काळात भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री बनतील असा दावा,  केला आहे. दरम्यान  वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
 
काय म्हणाले असिम सरोदे
असिम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.
दरम्यान राज्यात नवीन राजकीय जुळवा जुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असं मत असिम सरोदे यांनी मांडलं आहे.
 
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या निकालाच्या आधारे राज्यातील राजकारण बदलेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे काही आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकार पडू शकतं. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच संधी आहे.
 
अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांची अडचण होणार म्हणून ते बाजूला गेले आहेत. शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. ते महाविकास आघाडीसोबत किंवा भाजप सोबत जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे.
 
त्यामुळे असीम सरोदे यांच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor