गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (22:21 IST)

एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाचा चांगलाच धुमाकूळ ; यवतमाळ आगारात मद्यधुंद अवस्थेत आढळला ;

Alcoholic conducter  of ST busesHe was found drunk in Yavatmal depot
यवतमाळ बसस्थानकावर राजुरा अमरावती एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाने चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बस मध्ये बसलेले प्रवासी देखील या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले.

अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव असून तो एवढा दारू प्यायला होता की प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी चक्क 800 रुपयांचे तिकीट त्याने फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळ मध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र त्याचा प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.