शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मार्च 2020 (09:48 IST)

सर्व प्रवासाचे स्क्रिनिंग होणार

औरंगाबादमध्ये पुणे आणि मुंबईमधून आलेल्या आणि येणाऱ्या सर्व प्रवासाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. चार ठिकाणी स्क्रीनिग सेंटर उभारण्यात येणार आहे. रात्री येणाऱ्या प्रवाशांचंही स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३६ जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यापैकी सात जण संशयित असून पाच जणांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सातही रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे सद्यपरिस्थितीत औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात आठ संशयित रुग्णांवर विलगीकरण म्हणजे आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.