शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (17:35 IST)

पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक स्वगृही परतले

five councilors
शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता.

या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जवळपास २० मिनिटं चर्चा केली.