1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (18:46 IST)

अमळनेर: अमळनेरमध्ये दोन गटात दगडफेक, शहरात संचारबंदी लागू

अमळनेर शहरात दोन गटात किरकोळ वादावरून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. अमळनेर शहरात रात्री काही अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणावरून दगडफेक झाल्याची घटना जीनगरगल्ली, जुना पारधीवाडा आणि सराफबाजार भागात रात्री घडली. या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दुकानांची तोडफोड झाली. घरांवर दगडफेक झाली आहे. शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून काही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 
 
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी ही अमळनेरमध्ये भेट देऊन आढावा घेतला दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर अमळनेर शहरात शनिवारी सकाळी 11 ते सकाळी 11 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. आवश्यकता पडल्यास संचारबंदी वाढविण्यात येईल. असेही ते म्हणाले. 


Edited by - Priya Dixit