1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2023 (11:22 IST)

जळगाव: आमदार लताताई सोनवणें यांच्या वाहनाला डंपरची धडक होऊन अपघात

accident
जळगाव: जळगावच्या करंज गावाजवळ शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे  यांच्या वाहनाला डंपरची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहे.   
आमदार लताताई सोनवणे या आपल्या वाहनाने चोपडाहून जळगाव कडे जात असताना त्यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ वाहनाला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने त्या बचावल्या मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली आहे. 
 
गुळवेल तावसेगडताड येथील रस्ते कामाचे भूमिपूजनचे कार्यक्रम आटपून चोपडाहून जळगाव कडे निघालेल्या सोनवणे दंपती यांच्या वाहनाला समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या भरधाव वाळूच्या डंपराने धडक दिली. या अपघातात लताताई सोनवणे आणि प्रा. चंद्रकांत सोनवणे हे थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले.  
 
अपघाताची माहिती मिळतातच लताताई यांच्या निवासस्थानी समर्थकांनी गर्दी केली होती. लताताई आणि चंद्रकांत सोनवणे यांना मुका मार लागला आहे. तर अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit