1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:19 IST)

मनसेचा इशारा, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांनी 'ही' चुक सुधारावी, अन्यथा ..........

amazon
ऑनलाईन शॉपिंगमध्ये नावाजलेल्या कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांचे मोबाईल अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड यासारख्या अनेक भाषांचे पर्याय दिले आहेत. मात्र यामध्ये मराठी भाषेचा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे अनेक मराठी भाषिकांना या अ‍ॅपचा वापर करण्यात अडचणी येतात. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय देणे गरजेचे आहे. हा बदल करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात येत आहे. सात दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नाही. तर दिवाळी धमाक्याऐवजी कंपनीला आम्ही मनसेचा धमाका दाखवू असा इशारा मनसेचे महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला. तसेच दसरा दिवाळीमध्ये रस्त्यावर कंपनीच्या एकाही डिलिव्हरी बॉयला फिरकू देणार नाही. तुमच्या कार्यालयाबाहेर सुरक्षारक्षक तैनात कराल पण बाहेरील रस्ता आमचा आहे, असे सांगत अखिल चित्रे यांनी ही बाब जर चुकून झाली असेल तर त्वरित माफी मागून लवकरात लवकर अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा, असाही इशारा दिला आहे.
 
संपूर्ण महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी असून, या भाषेचा यथोचित आदर राखणे व वापर होणे बंधनकारक आहे. कंपनींच्या अ‍ॅपमध्ये माहिती घेणे, विकत घेणे, जनसंपर्क करणे इत्यादी गोष्टीसाठी अनेक पर्यायी भाषा दिल्या आहेत. पण या पर्यायांमध्ये मराठी भाषेचा समावेश न करून मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे तातडीने अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या कंपन्यांनी ही चुक सुधारावी, असेही चित्रे यांनी सांगितले.