1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (09:01 IST)

अॅमेझॉन नरमली, मनसेसोबत चर्चा करण्याची तयारी

Amazon softened
मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर अॅमेझॉन  कंपनी नरमली आहे. मनसेसोबत चर्चा करण्याची अॅमेझॉनची तयारी आहे. मात्र मागणी मान्य केल्याशिवाय चर्चा नाही, असा मनसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 
 
ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अॅमेझॉनने इतर अन्य प्रादेशिक भाषेला महत्व दिलेले आहे. मात्र, मराठीबाबत आकस कशाला, असा सवाल करत मनसेने मराठीला प्राधान्य न दिल्याने खळ्ळ खटॅकनंतर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अॅमेझॉन कंपनीकडून चर्चेची तयारी असल्याचे सांगण्यात आले. अॅमेझॉननं चर्चेची तयारी असली तरी  अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अॅमेझॉनकडून आठवडाभरात मराठीला स्थान देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.