गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (09:06 IST)

नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

prakash ambedkar
सात मतदारसंघांमध्ये मात्र वंचितकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. असं असताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
 
वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी वंचितने हा निर्णय घेतला आहे. त्यावर पलटवार करताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध असल्यानेच त्यांना नितीन गडकरी यांच्या पराभवाचं दु:ख होणार आहे, असा हल्लाबोल आंबेडकर यांनी केला आहे.
 
दरम्यान, नाना पटोले यांना पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास कशामुळे नकार दिला, हे आज समोर आलं आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor