1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2024 (09:35 IST)

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून धडकली एंबुलेंस, डॉक्टरचा मृत्यू

accident
महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाले म्हणून एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या दरम्यान जलद गतीने येणारी 108 एंबुलेंस ट्रकच्या मागील बाजूवर जोरदार धडकली. यामध्ये एंबुलेंस मध्ये असलेल्या डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एंबुलेंसचा ड्राइव्हर गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात एका अपघातामध्ये डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. 108 एंबुलेंस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅकवर मागून धाकली आहे. नागिरकांनी सांगितले की, ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या दरम्यान एक एंबुलेंस जलद गतीने येत होती व चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे एंबुलेंस थेट ट्रॅकवर धडकली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार काळ रात्री 2 वाजेच्या सुमारास हे एंबुलेंस उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. अमरावतीला पेशंट सोडून ही एंबुलेंस परतत होती. त्या दरम्यान हा अपघात घडला आहे.