गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (09:36 IST)

अॅम्ब्युलन्स ट्रॅफिक जॅममध्ये अडकली, चिमुकला गेला

कोल्हापुरात अॅम्ब्युलन्स ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने  एका चिमुकल्याचा गेला आहे. कार्तिक कारगदे असं या चिमुकल्याचं नाव आहे. कोल्हापुरातील ट्रॅफिकमध्ये अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. मात्र लोक  अॅम्ब्युलन्सला रस्ता देत नव्हते. 

गडहिंग्लजच्या कार्तिकला पोटात दुखू लागल्यानं त्याचे बाबा त्याला पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चालले होते. मात्र वाटेतच त्याची प्रकृती बिघडली आणि कुटुंबियांनी अॅम्ब्युलन्स कोल्हापूरकडे वळवली. त्यावेळी  अॅम्ब्युलन्स ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. कार्तिकचे वडील जीवाच्या आकांताने लोकांना विनवण्या करत होते. अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्यासाठी हातापाया पडत होते. मात्र त्यांना कुणीही वाट मोकळी करुन दिली नाही.