शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (16:00 IST)

टोपे यांच्या 'त्या' वक्तव्यावर अमित देशमुख नाराज

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती दिली. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालन्यात बोलत होते. राजेश टोपे यांनी खोलवर माहिती न घेता हे वक्तव्य केल्याचं दिसत आहे असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
 
“टेस्ट किट्सचा पुरवठा करण्यासाठी ते पुढे आले होते. ज्या बाबी समोर आल्या आहेत त्याची सखोल चौकशी होत आहे. चौकशीअंती जे समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असं अमित देशमुख यांनी सांगितलं. राजेश टोपेंच्या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राजेश टोपे जे बोलले ते मी ऐकलं नाही, पण कानावर जे आलं त्यावरुन खोलवर माहिती न घेता हे राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं असं वाटतं आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि समज, गैरसमज दूर करेन”.