शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (15:41 IST)

आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विट करत महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे.
 
शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं म्हटलं आहे. प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”.
 
“आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.