गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (13:08 IST)

मी अशी चूक करणार नाही! अमृता फडणवीसांचं खडसेंना प्रत्युत्तर

गेल्या काही ‍दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शाब्दीक बाण चालवत आहे. फडणवीस देखील उत्तर देत असल्यामुळे त्यांच्यात शाब्दीक चकमक रंगली आहे. अशात आता निशाणा अमृता फडणवीस यांच्यावर आल्यावर त्यांनी प्रत्युत्तर ‍दिलं आहे.
 
“तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी खडसेंना ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. 
 
“अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” असं म्हणत खडसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. 
 
असे होते प्रकरण
एमआयडीसीच्या जमिनीशी आपला संबंध नसून आपला व्यवहारही झालेला नाही. मी महसूलमंत्री होतो म्हणून माझ्या बायको आणि जावयानं व्यवहार करायचे नाहीत का? असा सवाल खडसे यांनी केला होता. 
 
तसेच यात अमृता फडणवीस यांचा मधे करत त्यांनी म्हटले की समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. असं खडसे म्हणाले होते.