शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:25 IST)

नवरात्रोत्सवात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर बंदच

शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर हा उत्सव मंदिर अंतर्गत साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात नियोजनाची बैठकीत मंदिरातील सर्व धार्मिक विधी शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र परंपरेनुसार मंदिरा अंतर्गत धार्मिक विधी केले जाणार आहेत,’ असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
 
उत्सव काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियम व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार आहेत, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे एकूणच साडेतीन खंडपीठात पैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार नाहीत.