1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Threatening phone calls to Girish Mahajan and Ashish Shelar

भाजपा नेते गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांना धमकीचे फोन

भाजप नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनाही मंगळवारी रात्री दहा वेळा धमकीचे कॉल आले.
 
जामनेर येथे एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून जामनेर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरकारनामाने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
दरम्यान, मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार यांनाही धमकीचे फोन आले होते. या फोन करणाऱ्यांना पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केली आहे. 
 
पुढील लेख
पावसाचा तांडव, हैदराबादमध्ये भयंकर परिस्थिती, १४ जणांचा मृत्यू