कामगारांचे मोबाईल रिचार्ज संपल्यामुळे गोंधळ
मंगळवारी वांद्रे स्टेशनवर जमाव केलेल्या परराज्यातील मजुरांच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण रंगत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं ही घटना घडल्याचे म्हटलं तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यांना मुजरांच्या अस्वस्थतेचा कारण त्यांचा मोबाईल रिचार्ज संपणं असे सांगितले आहे.
आशिष शेलार यांनी पत्राद्वारे मजुरांना पुरेशा प्रमाणात जेवण व इतर शिधा मिळत नसल्याचा आरोपही केला आहे. तसेच काही प्रश्न मांडले आहेत जसे-
इतक्या मोठ्या संख्येनं मजूर एकत्र आलेच कसे?
सरकारी यंत्रणा किंवा पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही?
माहीत असेल तर त्यांना परवानगी कुणी दिली?
तसेच शेलार यांनी काही मागण्यात देखील केल्या आहेत-
मजुरांच्या रेशनची आणि जेवणाची तातडीनं व्यवस्था
या प्रकरणाबद्दल चौकशी
जमाव झालेल्या परिसरातील सर्व रहिवाशांच्या वैद्यकीय तपासण्या
मजुरांच्या देखील वैद्यकीय तपासण्या
मजुरांना तात्काळ आर्थिक मदत
आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिमेला मजुरांच्या निदर्शनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळं शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहिले आहे.