1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (12:20 IST)

पावसाचा तांडव, हैदराबादमध्ये भयंकर परिस्थिती, १४ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश व तेलंगणात पावसाने तांडव घातलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडलं आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य कार्यांसाठी रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. 
 
हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात अलर्ट जारी केले होते. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे.