शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2019 (16:54 IST)

भाजप प्रदेशाध्यक्षपदाबाबत नवीन खुलासा

रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने प्रदेशाध्यक्ष लगेच बदलला पाहिजे असे काही नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यातील प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील, असे महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 
 
तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, विखेंनी अद्याप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी अद्याप कोणतेही खातेही मागितलेले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय केंद्राशी बोलून करायचा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.