शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 8 जानेवारी 2020 (18:05 IST)

मनसेला नवचैतन्य, अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारीला मुंबईत मनसेचं पहिलं महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय वाटचालीची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.अमित यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पक्षाला नवचैतन्य आणि युवा नेतृत्त्व देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. 
 
याआधी अमित ठाकरे यांनी याआधी मनसेच्या काही आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचं नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केलं होतं. तर रेल्वे आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, व्यासपीठावरुन त्यांना सक्रियपणे भाषण केलेलं नाही.