शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (09:00 IST)

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आले फेसबुकवर

raj thakare's son amit thakare
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एंट्री केली आहे. काही तासातच त्यांच्या पेजला 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट करत त्यांनी फेसबुकवर पाऊल ठेवलं आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित ठाकरे यांनी फेसबुक सुरु करत राजकारणातच एंट्री केली असल्याचं बोललं जात आहे. ज्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याचकडून सुरुवात, असं वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे. अनेकांशी संपर्क साधायचा असतो, मात्र वेळेअभावी ते शक्य होत नाही. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून मनसैनिकांशी आपले सामाजिक आणि राजकीय विचार पोहचवता येतील, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.