गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (19:06 IST)

अमरावती : मुलांनी लावलं 80 वर्षाच्या वडिलांचे थाटामाटात लग्न

Children arrange marriage of 80 year old father
अमरावती जिल्ह्यांत एक अनोखे लग्न पार पडले. मुलांनी चक्क आपल्या 80 वर्षाच्या वडिलांचे लग्न 65 वर्षाच्या महिलेशी थाटामाटात पार पडले. या लग्न सोहळ्याला वधू-वरांचे मुलं, सुना, नातवंडे सहभागी झाले होते. या लग्नाची जिल्ह्यांत चर्चा होत आहे. 

हे प्रकरण अमरावतीतील अंजनगावच्या सुर्जी तालुक्यातील चिंचोली राहिमापूर येथील आहे.80 वर्षीय विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. विठ्ठल यांना चार मुलें, मुली, नातवंडे असा परिवार असून वराचा 50 वर्षीय मुलगा देखील 80 वर्षाच्या वर आणि 65 वर्षाच्या वधूच्या लग्नात सहभागी झाला होता. या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्याला एकटेपणा जाणवत होता. वडिलांनी लग्नाचा आग्रह धरल्यावर मुलांनी वडिलांसाठी वधू शोधण्यास सुरु केले. 

मुलांनी सुरुवातीला याचा विरोध केला. नंतर वडिलांच्या आग्रहाखातर मुलांनी होकार दिला आणि वडिलांसाठी वधू शोधू लागले. या साठी त्यांचा बायोडाटा तयार करण्यात आला. अखेर त्यांचा शोध संपला आणि अकोट, अकोल्यातील 66 वर्षीय महिलेशी लग्न ठरले. 

8 मे रोजी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला. मुलांनी आपल्या वडिलांची थाटामाटाने मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विठ्ठल यांची मुलें, नातवंडे  नाचताना दिसली. या लग्न सोहळ्यात चिंचोली रहिमापुरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. तालुक्यात या अनोख्या लग्नाची चर्चा सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit