शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2024 (10:27 IST)

अमित शहांची आज महाराष्ट्र आणि केरळमध्ये रॅली

amit shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये त्यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन करणार आहे. सोबतच ते महाराष्ट्र आणि केरळ मध्ये निवडणूक रॅलीमध्ये  देखील सहभागी होणार आहे. 
 
अमित शाह संध्याकाळी वाराणसीमधील पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय क्षेत्र आहे. जिथून ते आता तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे. ततपूर्वी अमित शाह सकाळी केरळ मधील अलपुझा लोकसभा क्षेत्र मध्ये आणि दुपारी महाराष्ट्रात अमरावती लोकसभा क्षेत्र मध्ये निवडणूक रॅली मध्ये सहभागी होणार आहे. 
 
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सकाळी केरळ तसेच दुपारी महाराष्ट्र येथील निवडणूक रॅलीमध्ये सहभागी होऊन संध्याकाळी वाराणसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन करतील. 

Edited By- Dhanashri Naik