1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2024 (09:45 IST)

विकासकामे होत असतील तर या सरकारला पाठिंबा का देऊ नये?- मुश्ताक अंतुले

मुश्ताक अंतुले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात अंतुले यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. 
 
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतुले यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे रायगड जिल्ह्यातील विकास कामे झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन अंतुले यांनी यावेळी केले.
 
आपण अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये काम केले. पण खऱ्या अर्थाने तटकरे यांनी केलेल्या विकासकामांमुळे आपण प्रभावित झालो आहोत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या संकल्पनेतील अनेक विकास योजना  तटकरे आणि अदिती तटकरे यांनी पूर्ण केल्या आहेत. 

अंतुले यांच्यानंतर जनकल्याणाची धडाडीने कामे करण्याची धमक फक्त तटकरे यांच्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे अनेक विकासकामे होत असतील तर या सरकारला पाठिंबा का देऊ नये? असा प्रश्न आपल्याला पडत होता. त्यामुळे आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे अंतुले म्हणाले.

Edited By -Ratnadeep Ranshoor