Amravati : एकाच कुटुंबातील सहा जणांना कार ने उडवले
अंगणात गप्पा करत बसलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना एका कारने उडवल्याची घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हे केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीचंदन गुजर असे त्याचे नाव असून तो हल्ल्या नंतर पळून गेला. .
मिळालेल्या माहितीनुसार, नाचोना गावातील अंभोरे कुटुंब घराच्या अंगणात गप्पा मारत बसलेले होते. आरोपीने कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली आणि तिथे उभे असलेल्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना उडवले. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या घटनेत शामराव लालूजी अंभोरे(वय 70),अनुसया शामराव अंभोरे (67), अनारकली मोहन गुजर(43) असे तिघे मयत झाले आहे. तर उमेश अंभोरे, किशोर शामराव अंभोरे, शारदा उमेश अंभोरे हे तिघे जखमी झाले आहे.
आरोपीचा दारूचा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय अवैधपणे नाचोना गावात सुरु आहे.आरोपीने पूर्व वैमनस्यातून हे प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. रागाच्या भरात येऊन आरोपीने कुटुंबातील सहा सदस्यांच्या अंगावर गाडी घातली या मुळे तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
Edited By- Priya DIxit