उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y+' सुरक्षा देण्यात आली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y+' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अमृता फडणवीस यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन प्रवास करताना पायलट वाहन म्हणून काम करते. महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
अमृता फडणवीस यांना Y+ सुरक्षा मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी एस्कॉर्ट वाहनासह ५ पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने या संदर्भात वाहतूक विभागाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. पण, अमृता फडणवीस यांनी सध्या ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाचा वापर सुरू केलेला नाही. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीलाच दिली जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे."अमृता फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली नव्हती. धोक्याची भीती लक्षात घेऊन उच्चाधिकार समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor