मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:11 IST)

अमृता ताई,“मानसिक स्वास्थ जपा”, शिवसेनेचा टोला

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवर अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत “मानसिक स्वास्थ जपा”, असा टोला लगावला आहे. याआधी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.   
 
“अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. मनस्वास्थ चांगले राहते”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.
 
“शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर मृता राहील. शिवसेनेची काळजी करु नका. आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे अयोग्य बरे का”, असा चिमटा नीलम यांनी काढला.