बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:01 IST)

रॉटव्हीलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी मध्ये रॉटव्हीलर जातीच्या कुत्र्याला खाणे देण्यासाठी गेलेल्या कामगाराच्या जीवावर बेतले आहे. या दुदैवी घटनेत ५५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. दिवाकर पाटील असे या कामगाराच नावे आहे. रत्नागिरीतील माजी उपनगराध्यक्ष बाळ मयेकर यांच्या घरात ही दुदैवी घटना घडली. 
 
दिवाकर पाटील हे गेल्या काही वर्षापासून बाळ मयेकर यांच्याकडे कामाला आहेत. सकाळी दिवाकर पाटील हे कुत्र्याला खाणे घालण्यासाठी गेले होते. यावेळी रॉटव्हीलर  कुत्र्यांने दिवाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, दिवाकर पाटील यांचे कुत्र्यांने लचके तोडले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुत्र्या त्यांच्यावर तुटून पडला होता. हा कुत्रा ताकदवान असल्याने त्याला आवरता येत नव्हते. त्यामुळे दिवाकर पाटील यांना कुत्र्याच्या हल्ल्यातून सोडवता येत नव्हते. 
 
दरम्यान, या कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी वनविभागासह प्राणी मित्रांची मदत घेतली. कुत्र्याला बेशुद्ध करून पाटील यांची सुटका करण्यात आली.  मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिवाकर पाटील यांचा मदतीआधीच मृत्यू झाला.